T-20 मॅचपुर्वीच कॅप्टन विराटला ‘खुशखबर’, वेस्टइंडिजचा ‘बादशाह’ 2 सामन्यातून ‘OUT’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ विंडीजच्या दौऱ्यावर असून आज भारतीय संघ टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली असून आपल्या दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या बाजूला टी -२० क्रिकेटचे बादशहा असलेल्या विंडीजने देखील जय्यत तयारी केली असून आजच्या सामन्यासाठी ते तयार आहेत.

मात्र सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी असून विंडीजसाठी मात्र चिंता करणारी गोष्ट आहे. त्यांचा धाकड अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा दुखापतीमुळे पहिल्या २ सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी विंडीजने जेसन मोहम्मद या खेळाडूला संधी दिली आहे. त्याने संघासाठी नऊ टी-२० सामने खेळले असून संघाचे नेतृत्व देखील केले आहे. सध्या कॅनडामध्ये सुरु असलेल्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने निवड समितीला याविषयी माहिती दिली. त्यानंतर निवड समितीने जेसन मोहम्मदाचा समावेश केला आहे. त्याने याआधी लीगमध्ये त्रिनिदाद एंड टोबॅगो आणि अमेझॉन वॉरियर्स यासाठी देखील खेळला आहे.

दरम्यान, या टी-२० सामन्यानंतर भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने देखील खेळणार आहे. त्यामुळे लवकर रसेल बरा व्हावा अशी अपेक्षा निवड समितीने व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त –