भारत ऑनलाइन सेगमेंटमध्ये चीनला देणार धक्का ! कॅट आणतेय ’भारत ई-मार्केट’, आता 24 तास उघडी राहतील ई-शॉप्स

नवी दिल्ली : लवकरच पूर्णपणे भारतीय ई-कॉमर्स पोर्टल ’भारतईमार्केट’ येत आहे. या कॉमर्स पोर्टलवर केवळ भारतीय सामान विकले जाईल. चीनमध्ये तयार वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाईल. यामध्ये कोणताही परदेशी गुंतवणुकदार नसेल. पोर्टलवर येणारा डाटासुद्धा भारतीय सर्व्हरवर राहील. व्यापार्‍यांची संघटना कॅट (CAIT) चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्यानुसार, 30 ऑक्टोबरला पोर्टलचा लोगो लाँच केला जाईल, तर डिसेंबर 2020 पर्यंत हे पोर्टल सार्वजनिक केले जाईल.

आता अशी 24 तास उघडी राहतील भारतीय दुकाने
कॅटचे म्हणणे आहे की, एकीकडे या पोर्टलमुळे देशभरातील व्यापार्‍यांच्या व्यवसायात वाढ होईल. तर, दूसरीकडे या पोर्टलद्वारे व्यवसायिकांची दुकाने 24 तास उघडली राहतील. कॅट देशातील व्यवसायिकांची प्रमुख संघटना आहे. संघटनेचा दावा आहे की, त्यांच्यासोबत देशभरातील 40 हजारपेक्षा जास्त व्यापारी संघटना जोडल्या आहेत, ज्यांच्या द्वारे कॅट देशातील 7 कोटी व्यापार्‍यांचे प्रतिनिधीत्व करते. ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी सप्लाय चेन आहे. भारतईमार्केटवर जास्तीत जास्त व्यापार्‍यांची ई-दुकाने बनवण्याच्या कामात देशातील व्यापारी संघटना पूर्ण ताकदीने उतरतील.

ई-कॉमर्स पोर्टलमध्ये ही वैशिष्ट्ये
देशात ई-कॉमर्सचा वेगाने वाढणारा प्रभाव पहाता आणि देशातील नाराज व्यापार्‍यांच्या फायद्यासाठी कॅटने स्वताचे ई-कॉमर्स पोर्टल लाँच करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. यानंतर कॅट लागोपाठ भारतईमार्केट प्रोजेक्ट (bharatemarket project) वर काम करत आहे. हे पोर्टल बनवण्यासाठी अत्याधुनिक टेक्नोलॉजी, डिलीव्हरी सिस्टम, सामानाची क्वालिटी कंट्रोल, डिजिटल भरणा याचा वापर केला जाईल.

व्यापारी आणि ग्राहकांमध्ये सर्वे करून तयार केला लोगो
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया यांनी दसर्‍यानिमित्त सांगितले की, भारतईमार्केटचा लोगो देशातील मोठी अ‍ॅडव्हरटायजिंग आणि ब्रँडिंग कंपनीने तयार केला आहे. यापूर्वी कॅटकडून करण्यात आलेल्या देशव्यापी सर्वेतून मिळालेल्या सूचनांच्या आधारे लोगो बनवण्यात आला आहे. सर्वेत व्यापार्‍यांसह ग्राहकांनासुद्धा सहभागी केले होते. पोर्टलचा लोगो ’भारतईमार्केट’ची वैशिष्ट्ये दर्शवतो.

You might also like