Coronavirus सोबत लढण्यासाठी भारताला मिळणार आणखी 5 व्हॅक्सीनची साथ, डिसेंबरपर्यंत तयार होतील 2 अरब डोस

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस विरूद्धच्या युद्धात भारताला लवकरच इतर 5 व्हॅक्सीनची मदत मिळणार आहे. भारत सरकारने एकुण 8 व्हॅक्सीनची संभाव्य यादी सादर केली आहे. सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मदतीने लसीकरण अभियान संथगतीने होत असले तरी, लवरकच इतर व्हॅक्सीन लोकांना देण्यास सुरूवात होईल. याच कारणामुळे आरोग्य मंत्रालयाने या वर्षी डिसेंबरपर्यंत भारतात सुमारे 2 अरबपेक्षा जास्त व्हॅक्सीन उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.

1. रशियन कोरोना व्हॅक्सीन स्पूतनिक व्ही
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रशियन व्हॅक्सीन स्पूतनिक-व्ही पुढील आठवड्यात भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

2. बायोलॉजिकल ई सब युनिट व्हॅक्सीन
मंत्रालयानुसार, बायोलॉजिकल ई सब युनिट एक सबयुनिट व्हॅक्सीन आहे, जी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहे. केंद्राला ऑगस्ट ते डिसेंबरच्या दरम्यान या लसीचे 30 कोटी डोस मिळतील अशी आशा आहे.

3. जायडस कॅडिला डीएनए व्हॅक्सीन
जायडस कॅडिलाची ही व्हॅक्सीन तिसर्‍या टप्प्याच्या ट्रायलमध्ये आहे, कंपनी लवकर लायसन्ससाठी भारतात अप्लाय करेल. ही तीन डोसवाली व्हॅक्सीन आहे आणि ती इंजेक्शन फ्री तंत्रज्ञानाने दिली जाईल. सरकारला डिसेंबरपर्यंत जायडस कॅडिला व्हॅक्सीनचे 5 कोटी डोस मिळण्याची आशा आहे.

4. नोवाव्हॅक्स अथवा कोवाव्हॅक्स
ही व्हॅक्सीन सुद्धा सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (सीरम) द्वारे भारतात बनवली जाईल. ही व्हॅक्सीन अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्सने विकसित केली आहे. सोबतच पुण्याची जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स कंपनी सुद्धा मेसेंजर आरएनए व्हॅक्सीन विकसित करत आहे. फायजर आणि मॉडर्न सुद्धा एमआरएनए व्हॅक्सीनच आहे.

5. भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सीन
भारत बायोटेक कंपनी सध्या नाकाने दिल्या जाणार्‍या नेजल व्हॅक्सीनवर काम करत आहे. ही सिंगल डोस व्हॅक्सीन असेल. सध्या, या व्हॅक्सीनची पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.