जगाचं नेतृत्व भारत करणार हे वाक्य खरे ठरण्याची वेळ आली : राजेश पांडे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – भारत हा युवकांचा देश असून पुढील काळात जगातल्या अनेक देशात कौशल्य कार्यात भारतातील युवकांना रोजगाराच्या संधी असणार आहेत. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे मोठे नेतृत्व मिळाले असून अलीकडील पाच वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रात झपाट्याने भारत प्रगती करीत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे जगाचं नेतृृत्व भारत करणार हे वाक्य खरे ठरण्याची वेळ आत्ता येवुन ठेपली असुन पुढील काळात युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारत सध्या ९० टक्के खनिज तेलाची आयात करणारा देश म्हणून ओळखला जातो. यासाठी ९० हजार कोटी रुपये खर्च होतात. पुढील काळात २० टक्क्याने आयात कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर येणारा काळ आपला असल्याचे मत सावित्रीबाई फुले पूणे विद्यापिठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

राजेश पांडे हे इंदापूर येथिल कला, विज्ञान आणी वाणिज्य महाविद्यालयामध्ये कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त युवा भान, युवा चेतना या विषयावर आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ एकपात्री कार्यक्रम झाला. यावेळी माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, भरत शहा, शिवाजी भुजबळ, नाना शेंडे, मारुतीराव वनवे, ॲड. कृष्णाजी यादव, प्रा. बाळासाहेब खटके, तुकाराम जाधव, लालासाहेब पवार, मंगेश पाटील, मयुर पाटील, रमेश जाधव, कैलास कदम यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘आय कॉलेज वार्ता वृृृृत्तपत्राचे प्रकाशन माण्यवरांचे हस्ते करण्यात आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘१९५२ सालापासून या तालुक्याच्या जडणघडणीत भाऊंचा मोठा वाटा आहे. १९५७ मध्ये इंदापूर तालुका अन्नधान्य, पाणी, शिक्षण क्षेत्रामध्ये कमी होता. १९६२ मध्ये पहिली वीज इंदापुरात आली. १९७२ मध्ये पहिले महाविद्यालय इंदापूरात उभारले. या काळात चार ते पाच हायस्कूल सुरू होते. आज त्यांची संख्या शंभराच्या वर झाली असून पाच ते सहा महाविद्यालय आहेत. तालुक्यात ४५ उच्च माध्यमिक शाळा, ४५० अंगणवाडी, ५५० प्राथमिक शाळा, व्यवसायिक महाविद्यालय हा सर्व बदल स्वर्गीय भाऊंच्या विचारामुळे झाला.

समाज उभारण्याचे कार्य भाऊंनी केले. लोकशाहीवरचा प्रगल्भ विश्वास, नैतिक अधिष्ठान असणारे भाऊंचे कार्य दिल्लीपर्यंत असल्याचे पाटील यांनी सांगीतले. यावेळी प्रास्ताविक संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी केले तर प्राचार्य संजय चाकणे यांनी पाहुण्यांची ओळख करून दीली. तर सूत्रसंचालन बाळासाहेब पराडे व रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या