‘चीन जोपर्यंत सैनिकांची संख्या कमी नाही करणार, तोपर्यंत भारत देखील नाही करणार’ : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसापासून भारत आणि चीन यांच्यात सीमावाद सुरु आहे. दोन्ही देशांनी आपापली भूमिका व्यक्त केली आहे. त्यानंतर अंतर्गत धुसफ़ुस सुरु असून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. त्यामध्ये त्यांनी भारत-चीनदरम्यान असलेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो. परंतु जो प्रयत्न चीन सीमेवर सैनिकांची संख्या कमी करत नाही तो पर्यंत भारतही आपल्या सैनिकांची संख्या कमी करणार नाही, असं रोखठोक उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं.

भारत आपल्या सीमाक्षेत्रात तेजीनं पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीननं काही योजनांवर आक्षेपही घेतला असल्याचं सिंह म्हणाले. राजनाथ सिंह म्हणाले, सध्या सुरू असलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कोणती वेळेची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही, यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा ठरवू शकत नाही. आम्हाला चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी अरूणाचल प्रदेशात चीननं गाव वसवल्याच्या वृत्तावरही भाष्य केलं. “हा परिसर सीमेच्या अतिशय जवळ आहे आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा अनेक वर्षांच्या कालावधीत विकसित करण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले.

या मुलाखतीत राजनाथ सिह यांना भारत आणि चीन या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध गेल्या चार दशकांच्या किमान स्तरावर आहेत आणि चीननं भारताच्या विश्वासाला तडा दिला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चीननं भारताचा विश्वास तोडला आहे यात कोणतीही शंका नाही,असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी सैन्य स्तरावर चर्चेच्या पुढील फेरीचा संदर्भ देताना चीननं अलिकडेच १९ जानेवारी रोजीचा चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याचं सांगितलं. चर्चेच्या एका दिवसांपूर्वीच आम्हाला याची माहिती मिळाली होती. म्हणूनच आम्ही ही चर्चेची फेरी २३ किंवा २४ जानेवारी रोजी पुन्हा निश्चित करण्यास सांगितलं. भारत कायमच चर्चेसाठी तयार असतो,” असंही सिंह म्हणाले.