…म्हणून भारत ११ दिवसांतच वर्ल्डकप जिंकणार ?

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष आहे. या स्पर्धेत भारत एकूण नऊ सामने खेळणार आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.

या स्पर्धेत भारतीय संघाची मदार हि कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीबरोबरच जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शामिवर असणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हा पूर्ण फिट झाला असून आजच्या सामन्यासाठी तो उपलब्ध आहे. त्याचबरोबर सराव सामन्यात शतक ठोकून चौथ्या क्रमांकावर दावा ठोकणारा के. एल.राहुल हा देखील फॉर्ममध्ये आल्याने चार नंबरचा प्रश्न सुटल्यात जमा असल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. त्यामुळे आता सर्व काही ठीक राहिले तर भारत नक्कीच या स्पर्धेत जगज्जेत्या होणार.

दरम्यान, एकूण ६आठवड्यांच्या या स्पर्धेमध्ये भारत एका आठवड्यानंतर पहिला सामना खेळत आहे. पहिल्या ११ दिवसांतच भारत चार महत्त्वाचे सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड आणि पाकिस्तानच्या विरोधात भारताने सामना जिंकला तर, वर्ल्डकपला गवसणी घालणे विराटसेनेसाठी सोपे होणार आहे. त्यामुळे नक्कीच कोहली अँड कंपनी या विजयासाठी आपले संपूर्ण कसाब वापरणार यात शंकाच नाही.

Loading...
You might also like