भारतीय कर्णधारांचा बोलबाला; कांगारूंवर दणदणीत वियज

अॅडिलेड : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका सुरु आहे. त्यातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंवर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर या सामन्यात 6 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर 299 धावांचं आव्हान दिलं होते. हे आव्हान भारताने 49.2 षटकात 4 विकेट्सवर सहज पार केले.

पहिल्या सामन्यात कमी धावसंस्थेवर बाद झालेल्या विराटने त्याची विराट खेळी दाखवली आणि 112 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत 105 धावा करत कारकिर्दीतलं 39 वं शतक ठोकलं. तर धोनीने नाबाद 55 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज बेहेरेनड्रॉफ गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने बॅट फिरवत षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूंवर 1 धाव घेत भारताला विजयश्री मिळवून दिली.

दरम्यान, भारताने या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली