U – 19 World Cup : PAK चा धुव्वा उडवत ‘यशस्वी’ एक्सप्रेसची फायनलमध्ये ‘धडक’, भारताचा 10 विकेट राखून विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध पाकिस्तान अशा झालेल्या अंडर 19 च्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय फलंदाजांनी नाबाद 176 धावांची शानदार खेळी करत अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. टाॅस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकने 172 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते, परंतु हे आव्हान अगदी सहज पूर्ण करत भारताने दणदणीत विजय साजरा केला. भारतीय क्रिकेटचा अंडर 19 संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये गेला आहे.

भारताने आता फायनलमध्ये सामन्यात प्रवेश केला आहे. पाकिस्तानच्या संघाला या सामन्यात 10 बाद 172 धावा बनवता आल्या. परंतु भारतीय क्रिकेट संघाच्या सलामवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. भारतीय संघाला फायनलमध्ये नेण्यात यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा मोलाचा वाटा राहिला. या जोडीने 30 षटक होईपर्यंत 120 धावा पूर्ण केल्या होत्या. या दोघांच्या शानदार खेळीने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वाल याने 105 धावा केल्या तर दिव्यांश सक्सेना याने 59 धावा केल्या. या जोडीच्या खेळीने 35.2 षटकांत भारताने शानदार विजय साजरा केला.

याआधी मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात धिम्या गतीने झाली. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा पहिला खेळाडू बाद झाला. पाकिस्तानने अखेरच्या षटकांत आपला संघ सावरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही. यात भारतीय गोलंदाजींची खेळी अद्वितीय ठरली. भारतीय गोलंदाजांनी चेंडूचा अचूक मारा करत पाकिस्तानच्या खेळाडूंना एका पाठोपाठ परत तंबूत पाठवले.

प्लेइंग इलेव्हन –
भारत अंडर – 19 – यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, तिलक शर्मा, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह

पाकिस्तान अंडर – 19 – हैदर अली, मोहम्मद हुरैरा, रोहेल नजीर (कर्णधार), फहाद मुनीर, कासिम अकरम, मोहम्मद हेरिस, इरफान खान, अब्बास आफरिदी, ताहिर हुसैन, आमिर अली, मोहम्मद आमिर खान