श्रीलंकेतील बॉम्बस्फोटातून ‘ही’ भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट घडले. या बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री राधिका शरतकुमार ही थोडक्यात बचावली आहे. ज्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. बॉम्बस्फोट होण्यापूर्वी काही वेळ त्या हॉटेलमधून बाहेर पडल्याने त्या बचावल्या.

राधिका यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. राधिका सिनामोन ग्रँड हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हे हॉटेल श्रीलंकेचे पंतप्रधान यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अरे देवा, श्रीलंकेत बॉम्बस्फोट.. मी बॉम्बस्फोट होण्याच्या काही वेळ आधी सिनामोन ग्रँडमधून बाहेर पडले. माझा यावर विश्वास नाही़ आश्चर्यकारक !

राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात दोन चर्चसह तीन हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत. त्या सिनामोन ग्रँड या हॉटेलचाही समावेश आहे. आतापर्यंत या बॉम्बस्फोटात २९० जणांचा मृत्यु झाला आहे. मृत्युंमध्ये ३ भारतीयांचा समावेश आहे.

Loading...
You might also like