‘त्या’ अपघातग्रस्त विमानातील सर्व 13 जवान ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष सापडले. अपघातस्थळी शोध पथक सकाळी पोहोचलं मात्र त्या विमानातील क्रू मेंबरर्ससह १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याविमानात ८ क्रू मेंबर आणि ५ इतर असे १३ जण होते. यासंदर्भात भारतीय हवाई दलाने १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आहे.

अरुणाचलकडे जाताना बेपत्ता झाले होते विमान
आसामच्या जोरहाट येथून उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान अरूणाचलकडे ३ जून रोजी उड्डाण केले होते. त्यावेळी विमानात १३ जण होते. १२ वाजून २५ मिनीटांनी विमानाने अरुणाचलच्या दिशेने उड्डाण केले. मात्र एकच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. यानंतर विमानाचा शोध सुरु करण्यात आला. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दालाने सुखोई-३० आणि सी १३० या विमानांची मदत घेतली.

विमानाचे अवशेष सापडले
अखेर विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडले. त्यानंतर विमानातही तेरा पैकी काही जण जिवंत असल्याची शक्यता असेल असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते. मात्र बेपत्ता विमानाचा शोध घेत असताना विमानाचे पायुम नावाच्या गावाजवळ अवशेष दिसल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र त्यानंतर आज विमानाच्या अवशेषांजवळ शोध पथक पोहोचले तेव्हा त्यातील १३ जणांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. त्यानंतर या सर्व १३ जणांच्या कुटुंबियांना यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे हवाई दलाच्या सुत्रांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त – 

 

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

Loading...
You might also like