#Video : पाकिस्तानच्या विमानाची भारतीय हद्दीत घुसखोरी ; वायू दलाकडून कसून चौकशी सुरु

जयपूर : वृत्तसंस्था – पाकिस्तानातून आलेले एक कार्गो विमान राजस्थानातल्या जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानावरून आलेले हे मालवाहू विमान जबरदस्तीने खाली उतारावल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ Antonov AN-12’ के कार्गो विमान पाकिस्तानातून येत होते. तेव्हा या विमानाला भारतीय हवाई दलाने घेरले आणि जयपूर येथील विमानतळार उतरवले आहे. या विमानाच्या वैमानिकाची कसून चौकशीचे करण्यात येत आहे. मात्र यावर अद्याप भारतीय दलाकडून आधिकृत माहिती देण्यात आलि नाही. त्यामुळे पाकिस्तानहून आलेलं हे मालवाहू विमान भारतील हद्दीत आलं कसं याची चौकशी आता हवाई दलाकडून करण्यात येत आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आज पाकिस्तान हवाई हद्दीतून एक विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले. मात्र, हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टमच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ ते विमान जयपूर विमानतळावर उतरविण्यास भाग पाडले. आपला मार्ग सोडून चुकीच्या पद्धतीने विमानाने भारतीय हद्दीत का प्रवेश केला, याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

अँटीनोव एन-१२ हे विमान जॉर्जियाचे आहे. या विमानाला शुक्रवारी दुपारी कराची येथून उड्डाण घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, या विमानाने आपला मार्ग बदलला आणि ते उत्तर गुजरात जवळील भागातून भारतीय हद्दीत घुसले. मात्र, हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टमने त्या विमानाला अडविले.

विमानाच्या घुसखोरीच्या अलर्टनंतर भारतीय हवाई दलाने त्या विमानाला जयपूर विमानतळाच्या जागेत उतरविण्यास भाग पाडले. यातील वैमानिकाची कसून चौकशी केली जात आहे.