भारतीय वायूसेनेकडून ‘ड्रॅगन’ला दणका, बॉर्डरवर लढाऊ विमानांचं नाईट ऑपरेशन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व लडाखजवळील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच १५ जून रोजी दोन्ही देशांमध्ये हिंसाचार झाला. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. दरम्यान, गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या अनुषंगाने भारतीय वायुसेनेने मिग १९ लढाऊ विमान आणि चिनूनक हैवीलिफ्ट विमानांनी सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन केलं आहे.

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे. तसेच लष्करानं कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची तयार केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायुदलाने सुद्धा लढाऊ विमान सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.

यासंदर्भात जेष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन राठी यांनी सांगितलं की, नाईट ऑपरेशन हे एखाद्या गिफ्ट सारखं असत, ज्यामुळे वायुसेना आधुनिक प्लॅटफॉर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहतात.

भारताने दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच पूर्व लडाखमधील चिनी सैन्य मागे हटण्यासाठी देखील मान्य झालं. पण भारत चीनवरती विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे भारताने तयारी सुरूच ठेवली आहे.

एअरफोर्सचे अपाचे हेलिकॉप्टर सीमेवर फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन करताना दिसून आले. तसेच मिग २९ फायटर एअरक्राफ्ट आणि चिनूक हैवीलिफ्ट हेलिकॉप्टर नाईट ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. त्यामुळे भारताचे सामर्थ असलेली वायुसेना पूर्ण ताकदीनिशी सीमेवर ऑपरेशन करत आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like