‘पाक’सोबतच्या तणावामुळं भारतीय सैन्याची ‘पावर’ वाढतेय, पुढच्या महिन्यात पहिलं ‘राफेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तानात वाढत्या ताणतणावात भारतीय सैन्याची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे. येत्या २० सप्टेंबरला भारताच्या सैन्यदलात पहिले राफेल विमान सामील होईल. अशी माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या विविध संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिले राफेल विमान भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. फ्रान्सचे अधिकारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पहिले राफेल विमान खरेदी करणार आहेत. त्यानंतर २० सप्टेंबरलाच हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समील होईल. यावेळी फ्रान्सचे अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित असतील.

त्यानंतर भारतीय हवाई दल राफेल विमानांच्या उड्डाणासाठी चोवीस वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ते प्रशिक्षण घेतील. पुढील वर्षी मे महिन्यात सर्व राफेल विमाने भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामील होतील. तोपर्यंत या वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु राहिल.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like