भारतीय वायुसेनेत सर्वात खतरनाक हेलिकॉप्टर दाखल ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेत नवनवीन हेलिकॉप्टर आणि विमानांचा समावेश होत आहे. आता लढाऊ हेलिकॉप्टर अपाची गार्जियनचा भारताच्या ताफ्यात समावेश झाला आहे. भारताने अमेरिकेशी या संदर्भात २२ हेलिकॉप्टरचा करार केला आहे. बोइंग एएच-६४ अपाचे हे जगातील सर्वात घातक हेलिकॉप्टर मानले जाते. हे हेलिकॉप्टर पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात ‘अपाची’ हे भारतात समारंभाद्वारे वायू दलात दाखल होईल. या वर्षी ९ तर २०२० च्या अखेरीस उर्वरित १३ अपाची हेलिकॉप्टर वायू दलात दाखल होणार आहेत. वायुक्षमता कमी झाल्याने भारतीय वायुदल चिंतेत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर ४२ हेलिकॉप्टरची गरज असताना भारताकडे फक्त ३१ हेलिकॉप्टर आहेत. पर्वत आणि जंगलांमध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हेलिकॉप्टरची खूप मदत होणार आहे. अपाची हे जगात हल्ला करण्यासाठी सर्वोत्तम हेलिकॉप्टर समजले जाते. कोणत्याही हवामानात हे हेलिकॉप्टर हल्ला करु शकते. रॉकेट, टँकवर निशाणा साधणारे मिसाईल यामुळे या हेलिकॉप्टरला जगात फार मागणी आहे.

दरम्यान, अपाची हेलिकॉप्टर हे गेल्या ४ दशकांपासून अमेरिकेच्या वायु सेनेचा हिस्सा आहे. हे हेलीकॉप्टर इस्त्रायल, मिस्त्र आणि नेदरलॅंड यांच्याकडे देखील असून ते अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज आहे.