भारतीय वायुसेनेत ‘ग्रुप-सी’मध्ये भरती ! 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; 1500 जागांवर होणार भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय वायुसेनेत दहावी पास ते पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. इंडियन एयरफोर्सने ग्रुप-सी च्या सिव्हिलिअन पोस्टसाठी बंपर भरती सुरू केली आहे. 1500 विविध पदावर भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. खाली दिलेले नोटिफिकेशन डाऊनलोड करा. त्यात अर्ज दिला असून त्याची प्रिंट घ्या अन् संपूर्ण माहिती भरा. त्यांतर आवश्यक त्या कागदपत्रांसह कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर 9 मे 2021 च्या पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवा.

पदांनुसार शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. 10 वी पास ते आयटीआय कोर्स करणारे किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. 18 ते 25 वर्षांपर्यंत तरुण (आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल) अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी काय पात्रता हवी याची माहिती दिलेल्या नोटिफिकेशन लिंकवर करून मिळू शकेल. रिक्त पदांवर नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेच्या आधारे योग्य त्या उमेदवारांची निवड केली जाईल.

पदांचा तपशील खालील प्रमाणेः

सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर – 2 पदे

स्टोर सुपरीटेंडेंट – 66 पदे

स्टेनोग्राफर ग्रेड 2- 39 पदे

लोअर डिवीजन क्लर्क (LDC) – 53 पदे

हिन्दी टायपिस्ट – 12 पदे

स्टोर कीपर – 15 पदे

सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर – 49 पदे

स्वयंपाकी – 124 पदे

पेंटर – 27 पदे

कारपेंटर – 31 पदे

आया/ वॉर्ड सहायिका -24पदे

सफाई कर्मचारी – 345 पदे

धोबी – 24 पदे

मेस स्टाफ – 190 पदे

एमटीएस – 404 पदे

वल्कनाइजर – 7 पद

टेलर – 7 पदे

टिनस्मिथ -1 पद

कॉपर स्मिथ एंड शीट मेटल वर्कर – 3 पदे

फायरमन – 42 पदे

फायर इंजन ड्रायवर -4 पदे

फिटर (मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) -12 पदे

ट्रेड्समन मेट – 23 पदे

लेदर वर्कर – 2 पदे

टर्नर – 1 पद

वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक – 1 पद

एकूण पदांची संख्या – 1508