Indian Air Force Recruitment 2021 | 10 वी ते पदवीपर्यंतच्या मोठी संधी ! भारतीय वायुदलात ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय वायु दलात (Indian Air Force) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये दहावी ते पदवी उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी (Indian Air Force Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

 

  • कुक (Cook)
  • एमटीएस (MTS)
  • एलडीसी (LDC)
  • अधीक्षक (Superintendent)
  • सुतार (Carpenter)
  • फायरमन (Fireman)
  • सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

  • कुक (Cook) – प्रमाणपत्र किंवा कॅटरिंगमधील डिप्लोमासह मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण. तसेच संबंधित ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव
  • एमटीएस (MTS) – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एलडीसी (LDC) – मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास. तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.
  • अधीक्षक (Superintendent) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष.
  • सुतार (Carpenter) – मान्यताप्राप्त संस्थेतील ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10 वी पास.
  • फायरमन (Fireman) – अग्निशमन प्रशिक्षणासह 10 वी पास.
  • सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (Civil mechanic Transport driver) – उमेदवार परवान्यासह 10 वी उत्तीर्ण असावा.

 

ही कागदपत्रे आवश्यक –

 

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://indianairforce.nic.in/

सविस्तर माहितीसाठी – http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10801_16_2122b.pdf

 

Web Title :  indian air force recruitment 2021 openings for 10th passed to graduate candidates apply here marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार

Pune Crime | पीएमटी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारा चोरटा गजाआड, 4 गुन्हे उघड

Gold Price Today | सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे नवीन दर