शत्रू विरुद्ध देशातील ‘या’ 22 नॅशनल ‘हायवे’चा वापर करणार भारतीय वायुसेना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – इंडियन एअर फोर्स लवकरच देशातील 22 महत्वाच्या नॅशनल हायवेवर आणि एक्सप्रेस वे वर आपले विमान उतरवणार आहे. असे करुन भारताची ताकद वाढेल. दोन एक्सप्रेस वे यमुना आणि आगरा लखनऊ एक्सप्रेस वे वर फायटर आणि ट्रांसपोर्ट एअर क्राफ्ट उतरवण्याच्या इराद्यात आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर एअर फोर्सला प्रोस्ताहन मिळाले आहे. येथे अत्यंत जड ट्रान्सपोर्टचे प्लेन हरक्यूलिस उतरवण्यात आले होते.

येथे आहेत ते हायवे आणि एक्सप्रेस वे –
देशातील विविध राज्यात 22 हायवे आणि एक्सप्रेस वे वर लढाऊ आणि ट्रान्सपोर्ट विमान उतरवू शकतात. संरक्षण मंत्रालयाने या सर्व हायवेचे बारीक निरिक्षण केले. यासाठी परिवहन मंत्रालयाने सहमती दिली. काही हायवेला मंजुरी देखील मिळाली आहे. यासाठी ग्रेटर नोएडा ते आग्रापर्यंत यमुना एक्सप्रेस वे वर फायटर एअरक्राफ्ट उतरवण्याची प्रॅक्टिस देखील झाली आहे. या लिस्टमध्ये यमुना आणि आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वे चे नाव सहभागी आहे. लखनऊ बलिया एक्सप्रेस वे वर एअर फोर्सच्या यादीत आहे.

याशिवाय दिल्ली – मुरादाबाद एक्सप्रेस वे चे देखील नाव आहे. मुरादाबाद एक्सप्रेस वे वर विमान उतरवण्यास मंजूरी दिली आहे. हायवेची हवाई पट्टी विकासित करण्यात येत आहे. ज्यावर वाहन देखील चालवले जाऊ शकते आणि विमान देखील उतरवले जाऊ शकते.

याशिवाय छत्तीसगड, ओडिसा, जम्मू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, असाम, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान इत्यादी राज्यात स्थित हायवेंवर विमान उतरवण्याची तयारी आहे. हायवेवर एअरफोर्सकडून विमानांची आपातकालीन परिस्थितीत लँडिंग करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

परिवहन मंत्रालयाच्या सहयोगाने संपूर्ण देशातील सर्व हायवेचा समावेश करण्यात आला आहे. विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी नॅशनल हायवेची निवड एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल. अनेक हायवेंची दुरुस्ती करण्यात येईल. नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडियाच्या रस्त्याचा काही भाग एअरफोर्सच्या मापदंडानुसार तयार करण्यात येतात.

कोणत्या कोणत्या देशात झाले आहे रनवे –
21 मे 2015 साली भारतात रस्त्यांचा रनवे म्हणून वापर पहिल्यांदा झाला. तर अनेक देशात असा वापर करण्यात आला आहे. भारताआधी सिंगापूर, स्वीडन, फिनलँड, जर्मनी, पोलंड, चीन गणराज्य (तैवान) मध्ये हा प्रयोग झाला आहे. पाकिस्तानकडे देखील असेच दोन रोड रनवे आहेत ज्याचा वापर ते युद्धा दरम्यान आपातकालीन परिस्थिती करु शकतात. पाकिस्तानचा पहिला रोड रनवे एम – 1 आहे जो पेशावर पासून इस्लामाबाद हायवेवर बनवण्यात आले आहे, दुसरा एम – 2, इस्लामाबाद – लाहोर हायवेवर देखील रनवे तयार करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com