भारतात घुसणारे विमान F-16 नव्हे तर ते JF-17 ; पाकिस्तानचा कांगावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी F-16 नव्हे तर JF-17 चा वापर केला आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आल्याची बातमी सीएननने दिली आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिली आहे. तसंच JF-17 या लढावू विमानाचे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तरीत्या तयार केले आहे, असेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानने F-16 हे लढाऊ विमान अमेरिकेकडून घेतले होते. शिवाय हे विमान भारताच्या विरोधात वापरू नये अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिली होती. भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. त्यात F-16 चा पाकिस्तानने वापर केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ही विमान परतवून लावली. त्यात भारतीय हवाई दलाचे मिग-21 या लढाऊ विमानाचा वापर भारताने केला होता. तेव्हा भारतीय हवाई दलाचे विगं कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे F-16 विमान पाडले. त्यात भारताचे मिग-21 हे विमानही कोसळले.

पाकिस्तानने भारताच्या विरोधात F-16 विमाना वापरल्याचे पुरावे भारतीय हवाई दलाने अख्ख्या जगासमोर मांडले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने याला विरोध करत आम्ही F-16 वापर केला नाही, असा कांगावा केला.

दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी अमेरिकेने दिलेले F-16 या विमानाचा वापर केला की नाही याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत, अशी माहिती अमेरिकेच्या दुतावासाच्या प्रवक्त्याने दिली आहे.