अमेरिकेतील निवडणुकीत प्रेस्टॉन कुलकर्णी यांचा पराभव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय-अमेरिकन वंशाचे श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी (Sri Preston Kulkarni) यांचा अमेरिकेतील काँग्रेशनल निवडणुकीत पराभव झाला आहे. रिपब्लिक पक्षाचे ट्रॉय नेहल्स (Troy Nehls) यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी हे टेक्सासमधून निवडणूक लढवत होते. नेहल्स यांनी 52 टक्के म्हणजेच 2 लाख 4 हजार 537 मते मिळवली आहेत. तर कुलकर्णी यांनी 47 टक्के म्हणजेच 1 लाख 75 हजार 738 मते मिळवली आहेत.

श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी हे माजी राजनैतिक अधिकारी आहे. त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात 14 वर्षे नोकरी केली आहे. इराक, इस्रायल, तैवान, रशिया आणि जमैका अशा देशांमध्ये कुलकर्णी यांनी काम केलं आहे.

श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी यांना परराष्ट्र धोरणांचा चांगला अनुभवन आहे. टेक्सासच्या 22 व्या जिल्ह्यात श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी यांचा पीटी ओलसन यांनी निसटत्या मतांच्या फरकानं 2018 मध्ये पराभव केला होता. श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी यांचे वडिल वेंकटेश कुलकर्णी हे लेखक आहेत. 1969 साली ते अमेरिकेत आले.