भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराचा इमरान खानला काश्मीर प्रश्नावर ‘खरमरीत’ इशारा !

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. या निर्णयावर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. आता तर पाकिस्तानाकडून युद्धाची भाषा बोलली जात आहे. त्यावर भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीर हा भारतातील अंतर्गत प्रश्न असून या विषयावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी चिथावणीखोर विधाने न करता शांत राहिले पाहिजे. इमरान खानने भारताशी युद्ध करण्याची वक्तव्ये करणे अगदी हास्यास्पद आहे. असे रो खन्ना म्हणाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. रो खन्ना हे अमेरिकेत डेमॉक्रॅटिक पक्षाचे खासदार असून ते सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करतात. या कार्यक्रमादरम्यान काश्मिरी-अमेरिकन समुदायाने काश्मीरच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शविला आणि काश्मीरला दारिद्र्य आणि दहशतवादापासून मुक्त करण्याचे आवाहन केले.

रो खन्ना म्हणाले की, ‘काश्मीर हा भारतातील अंतर्गत प्रश्न आहे. या विषयावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भडकाऊ वक्तव्य करणे टाळले पाहिजे. युद्धाचे वातावरण बनवणे आणि तणाव वाढवणे यांच्यासारख्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे. इमरान खान यांनी भारताशी युद्धाची करण्याची भाषा आश्चर्यकारक आहे.

काश्मीर मुद्द्यावर यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हे स्पष्ट केले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. अमेरिकेप्रमाणेच इतरही अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थी नाकारली आहे. या देशांमध्ये रशियाचा देखील समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like