ओबीसी बँकेत होऊ शकते ‘या’ बँकांचे विलनीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकार लवकरच आणखी ३ बँकांच्या विलनीकरणाची घोषणा करु शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बडोदा बँकमध्ये देना बँक आणि विजया बँकेच्या विलनीकरणानंतर सरकार ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेत इंडियन बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन बँकेंचे विलनीकरण करु शकते. फायनांशियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ओबीसीकडून तसा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असे असले तरी त्यावर मंत्रालयाकडून कोणतीही चर्चा झालेली नाही.

दोन्ही बँकेचे वाढले शेअर
विलनीकरणाच्या शक्यतेनंतर या दोन्ही बँकेचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी बँकेचा शेअर २८५ टक्क्यांनी वधारला तर कॉर्पोरेशन बँकेचे शेअर १.२१ टक्क्यांनी वधारला. तर तिकडे इंडियन बँकेचा शेअर ५ टक्क्यांनी खाली घसरला.

ओबीसीला लाभ, पण इंडियन बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे आर्थिक नुकसान
मागील आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत २०१.५ कोटी रुपयांचा लाभ ओबीसी बँकेला झाला होता. या आधीच्या आर्थिक वर्षात ओबीसीला १६५०.२२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अशातच झालेल्या लाभात ३९ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. कॉर्पोरेशन आणि इंडियन बँकेला या काळात तोटा सहन करावा लागला होता. इंडियन बँकेला १९० कोटीचे नुकसान सहन करावे लागले. तर कॉर्पोरेशन बँकेला ६५८१.४९ कोटीचे नुकसान सहन करावे लागले होते.

या आधी देखील पंजाब नॅशनल बँकेत ६ बँकांच्या विलनीकरणाचे वृत्त आले होते. परंतू पंजाब नॅशनल बँकेला चौथ्या तिमाहीत नुकसान सहन करावे लागल्याने हा निर्णय थांबण्यात आला.