कौतुकास्पद ! सैनिकांच्या श्वासासाठी ‘त्यांनी’ विकले दागिने, सियाचीनमध्ये लावला ‘ऑक्सिजन’ प्लॅन्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सियाचीनमध्ये तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याठिकाणी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सीजन आहे. मात्र पुण्यातील एका दाम्पत्याने जवानांसाठी या ठिकाणी ऑक्सीजन प्लॅन्ट उभारून नवीन आदर्श घालून दिला आहे.
यासाठी दाम्पत्याने आपले सोने आणि किमती वस्तू विकून पैसे उभे केले आहेत.

army-2_100819091834.jpg

कॅप्टन बाणा सिंह यांच्याकडून जवानांच्या या गरजेविषयी माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील योगेश चिताडे यांनी हा ऑक्सीजन प्लॅन्ट उभा करण्याचे ठरविले. यासाठी 24 एप्रिल 2018 मध्ये काम देखील सुरु झाले. यासाठी एकूण 2 कोटी रुपये फंड जमा करण्यात आला. योगेश चिताडे हे माजी लष्करी कर्मचारी असून त्यांची पत्नी सुमेधा चिताडे या शिक्षिका आहेत. हा फंड गोळा करण्यासाठी या दाम्पत्याला दीड वर्षांचा कालावधी गेला. संपूर्ण राज्यभर फिरून त्यांनी यासाठी लोकांना आवाहन केले.

डोनेशन के जरिए ऑक्सीजन प्लांट के लिए 2 करोड़ रुपये का फंड तैयार किया गया

या प्लॅन्टसाठी मशीन हि जर्मनीवरून मागवण्यात आली असून याची किंमत दीड कोटी रुपये आहे. दरम्यान, 15 ऑक्टोबरपूर्वी हा प्लॅन्ट तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. या महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात थंडी पडत असून याआधी त्यांना या प्लँटचे उद्घाटन करायचे होते. त्यामुळे चार ऑक्टोबर रोजी लेफ्ट. ज. वाई.के. जोशी यांच्या हस्ते या प्लॅन्टचे उदघाटन करण्यात आले.

Visit : Policenama.com 

You might also like