PAK च्या 2500 ‘नापाक’ हरकतीनंतर भारतीय लष्कर PoK मध्ये घुसलं, ! बघता-बघता आतंकवाद्यांचे तळ उध्दवस्त, 11 ‘पाक’ सैनिकांसह 25 दतशवाद्यांचा खात्मा

काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. पाकिस्ताननं आत्तापर्यंत तब्बल 2500 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले असून या हल्ल्यांत दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त झाले आहेत. तसेच 11 पाकिस्तानी सैनिकांसह 25 दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती सुरू झाल्या आहेत. शनिवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. तसेच जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होत . पाकिस्तानकडून अचानक भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करण्यात आलं होत. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने सर्जिकल स्ट्राइकनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यातील दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डे उद्ध्वस्त केले. लष्करी तळ उध्वस्त करण्यासाठी भारतीय सैन्यानं आर्टिलरी बंदूकीचा वापर केला आहे.

भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्रीय मंत्रालय अलर्ट असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत.

यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानने 2500 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघनन केले असून त्यात 21 भारतीय ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

visit : Policenama.com