पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! भारतीय लष्कराकडून PoK मध्ये घुसून 5 पाकिस्तानी सैन्याचा ‘खात्मा’

काश्मीर : वृत्तसंस्था – गेल्या अनेक वर्षापासुन दहशतवाद्यांसाठी माहेर बनलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम उघडली आहे. भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली असून दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्दवस्त केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 4-5 सैनिक ठार झाले असल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे.

सीमेवर घुसखोरी करणार्‍यांना पाकिस्तान मदत करीत असल्याचं वेळावेळी स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम हाती घेतली असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई चालू आहे. भारतीय सैन्यानं कारवाई करीत असताना आर्टिलरी बंदूकीचा वापर केला आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आलं होते.

Image
त्यामध्ये 2 भारतीय जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली असून त्यामध्ये 4-5 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला आहे.

visit : Policenama.com