भारतीय सैन्याकडून पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! PoK मध्ये घुसून ‘आर्टिलरी’ बंदूकीचा वापर करत अतिरेक्यांचे अड्डे ‘उध्दवस्त’

काश्मीर : वृत्तसंस्था – अतिरेक्यांसाठी माहेर बनलेल्या पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारतीय सैन्यानं मोहिम हाती घेतली आहे. भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उध्दवस्त केले आहेत. सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी अतिरेक्यांना पाकिस्तानकडून मोठी मदत केल्यानंतर सैन्यानं प्रत्युत्तरादाखल ही मोठी मोरवाई केली आहे.

Image

पाकच्या सैन्याकडून भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी अतिरेक्यांना वेळावेळी मोठी मदत केली जात होती. त्यामुळे पाकिस्तानच्या कारवायांविरोधात भारतीय सैन्यानं ही धडक मोहिमच उघडल्याचं लष्करातील सुत्रांनी सांगितलं आहे. भारतीय सैन्यांनी अतिरेक्यांचे तळ नेस्तनाभूत केले आहेत. त्यामध्ये आर्टिलरी बंदूकीचा वापर करण्यात आला आहे. सीमवर घुसखोरी करणार्‍यांना मदत करणार्‍या पाकिस्तानाला भारतीय लष्करानं मोठा दणका दिला आहे.

Image

Image

visit : Policenama.com

You might also like