पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर ! शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानं भारतीय लष्कराने PoK जवळील PAK च्या 10 चौक्या केल्या ‘उध्वस्त’

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीजफायरचे उल्लघंन सुरू आहे. काल पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा युद्धसंधीचे उल्लंघन करत भारतीय सीमेत गोळीबार केला. या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. भारतीय लष्कराने या फायरिंगचे पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने पीओके मध्ये एलओसी लगतच्या 10 पाकिस्तानी चौक्या उडवल्या.

भारताने केलेल्या या कारवाईतून पाकला सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्काराने एलओसीजवळच्या पाकिस्तानी चौक्या उडवल्या. भारताने ही कारवाई आपला जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराला धडा शिकवण्यासाठी केली. जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या गोळीबारात भारतीय जवान हरचरण सिंह शहीद झाले. ज्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्या उध्वस्त केल्या.

लष्कराने पीओकेच्या कहवलियन नाली सम्हानी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उडवल्या. आपल्या लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराला अशाप्रकारे अनेकवेळा धडा शिकवला आहे. लष्कराने यापूर्वी पीओकेतील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त केली होती. तर पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने बालाकोटमध्ये एयर स्ट्राइक करून दहशतवाद्यांना ठार केले होते.