‘प्रेग्नंट’ महिलेसाठी ‘देवदूत’ ठरल्या भारतीय लष्कराच्या डॉक्टर्स, धावत्या ट्रेनमध्ये केली ‘डिलिव्हरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हावडा एक्सप्रेसमध्ये शनिवारी एक गरोदर महिला प्रवास करत होती. या महिलेला याची बहुतेक कल्पनाही नसावी की ती या प्रवासात एक सरप्राईज देणार आहे. प्रवासात अर्ध्या रस्त्यातच या महिलेस बाळंत कळा सुरू झाल्या. ही महिला यासाठी नशीबान ठरली की याच ट्रेनमध्ये भारतीय लष्कराच्या दोन महिला डॉक्टरही प्रवास करत होत्या.

त्यांची नावे कॅप्टन ललिथा आणि कॅप्टन अमनदीप आहेत. या दोघी 172 मिलिट्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या दोन महिला डॉक्टरांनी महिलेच्या डिलिव्हरीमध्ये मदत केली आणि डिलिव्हरी सुखरूप झाली. भारतीय लष्कराच्या सार्वजनिक सूचना अतिरिक्त महानिदेशालयकडून यासंबधी ट्विट केले गेले आहे. या ट्विटमध्ये जन्माला आलेल्या बाळाचा फोटा आहे. सोबत लिहिले आहे की, आई आणि बाळ सुखरूप आहे.

तर दुसर्‍या घटनेत भारतीय लष्कराने शनिवारी सिक्किममध्ये नाथूला जवळ झालेल्या बर्फवृष्टीत फसलेल्या 1700 पर्यटकांना वाचवले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, 27 डिसेंबरला 13 व्या मैलपासून नाथूला जवळ मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने सुमारे 1500 ते 1700 पर्यटक अडकले होते. 300 टॅक्सीतून प्रवास करणारे पर्यटक त्सो तलाव – नाथू ला जवळून जात असताना अडकले.

बर्फामुळे मार्ग बंद झाला, यामुळे जवाहरलाल नेहरू मार्गालगत विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले. अधिकार्‍याने सांगितले की, अशा स्थितीत लष्कराने तातडीने मदत करून खराब हवामानातही मदतकार्य सुरू केले. अडकलेल्या पर्यटकांना लष्कराकडून जेवण, गरम कपडे आणि औषधांची मदत केली गेली. महिला, मुले आणि ज्येष्ठांसह सुमारे 1700 पर्यटकांना लष्कराने वाचवले आणि यापैकी 570 लोकांना 17 व्या मैलच्या लष्कराच्या तळावर आणण्यात आले. भारतीय लष्कर अजूनही मदतकार्य करत आहे. जणेकरून सर्व अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढून राजधानी गंगटोक येथे पाठवता येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/