काश्मीर : चकमकीत लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पुलवामानंतर आता जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरु झाल्या आहेत. येथे आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना दोन जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे.

दक्षिण काश्मीरमधील वनपुरात परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु झालं. त्यादरम्यान, दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलानीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत दोन दहशतवादी जागीच ठार झाले.

याबाबत काश्मीर झोनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे आणि ते कोणत्या संघटनेशी निगडित आहेत. याची माहिती घेण्याचं काम सध्या सुरु असल्याची माहिती मिळाली. याआधी मागील आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. ही चकमक हांजीपोरा भागात घडली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like