Coronavirus Impact : भारतीय लष्करानं रद्द केल्या जवानांच्या सुट्ट्या, अर्धसैनिक दलास मिळणार फक्त ‘इर्मजन्सी लिव्ह’

नवी दिल्ली : भरतीय लष्कराने जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत आपल्या सर्व कमांडला अ‍ॅडवायजरी जारी केली आहे. या अ‍ॅडवायजरीनुयार सर्व युद्ध सराव आणि कॉन्फरन्स पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. सध्याची स्थिती पाहता सर्व प्रकारचे सराव स्थगित करण्यात आले आहेत किंवा रद्द करण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराच्या अ‍ॅडवायजरीनुसार सुट्टी देणार्‍या अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी स्थितीत सुधारणा होईपर्यंत केवळ आवश्यकता आणि अनुकंपा तत्वावर सुट्टी द्यावी. सुट्टीवरून परतणारी तसेच विशेषता कोरोना व्हायरसने प्रभावित ठिकाणावरून परतलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तुकड्यांचे स्क्रीनिंग करण्यात यावे आणि त्यांना युनिटमध्ये आल्यावर क्वारंटाईन करता येऊ शकते.

भारतीय लष्कराने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील कँटीन आणि आवश्यक वस्तू भांडारात प्रवेश नियंत्रित करण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्व विनावश्यक स्टोअर्स बंद ठेवण्यास सांगितले आहे.

याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा कोरोना व्हायरसबाबत देशातील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे की, अर्धसैनिक दलांना केवळ इमर्जन्सी लीव्ह देण्यात यावी. तर केंद्राने मेडिकल स्टाफला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.

रोखण्यात आली भरती परीक्षा
लष्कराने बुधवारी म्हटले की, जवानांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास आणि कॉन्फरन्स रद्द करण्यासारखी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, लष्कराने सेवा निवड बोर्डाच्या (एसएसबी) परीक्षांसह देशभरातील आपली भरती प्रक्रिया रोखली आहे. त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी लष्कराने सुट्ट्यांवरून परतलेल्या जवानांना क्वारंटाईन केले आहे. तसेच काही ठिकाणी फ्लूच्या लक्षणांची तपासणी केली जात आहे.

लष्कराने आपल्या कर्मचार्‍यांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले आहे. हवाई दलाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, ज्या या आठवड्याच्या शेवटी होणार होत्या.

लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, लष्कराने लेहमधील लडाख स्काउट रेजीमेन्टच्या 34 वर्षीय एका जवानाला कोराना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लष्करातील हे पहिले प्रकरण आहे. अनेक राज्यात नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर भारतात या व्हायरसचा संसर्गाचे रूग्ण वाढून 151 झाले आहेत.