PoK मध्ये मोठी कारवाई ! भारतीय लष्कराकडून 11 ‘पाक’ सैन्यासह 22 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

काश्मीर : वृत्तसंस्था – पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मोठी कारवाई केली असून दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्दवस्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पाकिस्तानच्या 11 सैनिकासह 20 ते 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं मोहिम हाती घेतली असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई चालू आहे. भारतीय सैन्यानं कारवाई करीत असताना आर्टिलरी बंदूकीचा वापर केला आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आले होते. त्यामध्ये 2 भारतीय जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली असून त्यामध्ये पाकिस्तानच्या 11 सैनिकासह 20 ते 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

 

visit : Policenama.com

Loading...
You might also like