भारतीय सैन्यात हवलदार बनण्याची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्या उमेदवारांना भारतीय सैन्यात भरती व्हायचे आहे त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यात हवालदार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत आहे.

पदांची संख्या – 20

पदाचे नाव – हवालदार

शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित आणि विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –
सामान्य उमेदवारांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे तर सर्व्हिस करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे आहे.

फी –
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

महत्वाची तारीख –
अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 1 ऑक्टोबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख — 30 ऑक्टोबर 2019

निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

वेबसाइट- joinindianarmy.nic.in

visit : Policenama.com