‘या’मुळे इंडियन आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये होणार मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात महत्वपूर्ण बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. संरक्षण मंत्रालयाकडून यावर विचार सुरु असल्याचे कळते आहे. त्यामुळे आता लवकरच भारतीय सैन्य अधिकारी नवीन गणवेशात दिसतील. भारताच्या विविध राज्‍यातील हवामानातील विविधतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सेनेच्या गणवेशात कोणकोणते बदल करू शकतो, यासाठी सेनेच्या मुख्यालयाने सेनेच्या अधिकार्‍यांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत.

याविषयी सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यात सैनिकांचा गणवेश आरामदायी बनवण्याविषयी चर्चा झाल्याचे समजते. सैन्यदलांकडून आलेल्‍या तक्रारी, हवामान आणि इतर महत्‍वाचे घटक यांचा विचार करता, सैन्याच्या गणवेशात महत्‍वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. या आधीदेखील भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात छोटे -मोठे बदल करण्यात आले होते. भारतीय सैनिकांचा पहिला पाणा-पाणांची आकृती असलेला गणवेश होता. नंतर यामध्ये बदल केला गेला. तसेच बुटामध्येही काही बदल करून त्‍यांचा समावेश सैन्याच्या गणवेशात करण्यात आला.

दरम्यान, सध्या भारतीय सैनिकांच्या खांद्यावर लावण्यात आलेल्या पट्ट्यांवरून त्यांची रँक समजत असते. त्यातदेखील काही काही बदल करता येतील का ? यावर देखील विचार सुरु असल्याचे समजते. दुसर्‍या देशांच्या सैन्यामध्ये पँन्ट आणि शर्टचा रंग वेगळा असतो त्‍याप्रमाणे भारतात देखील असे करण्याचा विचार समोर आला आहे. भारतीय सैन्याच्या वरीष्‍ठ अधिकार्‍यांच्या मते सध्या ९ प्रकारचे गणवेश सैन्यात वापरात आहेत. त्‍यांना ४ श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like