भारतीय सैन्याकडून 2 पाकिस्तानी सैनिकांचा ‘खात्मा’, मृतदेह घेण्यासाठी पोहचलं पाक (व्हिडीओ)

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे. १० सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या दोन सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते त्यामुळे भारताने केलेल्या कारवाईत दोन सैनिक ठार झाले. त्यानंतर पांढरा झेंडा घेऊन पाकिस्तानचे सैनिक आले आणि मरण पावलेल्या आपल्या सैनिकांना घेऊन गेले.

कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे, ज्यात स्पष्ट दिसते कि एक जण पांढरा झेंडा घेऊन येतो आणि मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांची पाहणी करतो आणि नंतर बाकी सैनिकांना बोलावतो आणि मग सर्व मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे शव घेऊन जातात.

आजकाल पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन
या वर्षी पाकिस्तानने तब्बल 1889 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या वर्षीच्या मानाने हा आकडा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने 1629 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. अनेकदा तर भारताने दिलेल्या जोरदार प्रतिउत्तरामुळे पाकिस्तानने स्वतः शस्त्रसंधी पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे.

ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल 271 वेळा गोळीबार करण्यात आला आहे आणि पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आर्टिलरी तोफांचा सुद्धा वापर केला होता. ज्यावरून स्पष्ट झाले की पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता.

आरोग्यविषयक वृत्त –