भारतीय लष्करातील ‘मेजर’नं बनवलं जगातील पहिलं ‘बुलेटप्रुफ’ हेल्मेट, AK-47 ची ‘बुलेट’ देखील नाही घुसू शकत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर सीमेवर सतत पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याच्या जवानांना हेरत असते. तसेच दहशतवादी कारवाई दरम्यान सैन्याच्या जीवाची देखील चिंता असते. याच कारणाने सैन्याचा सुरक्षेसाठी मेजर अनुप मिश्रा यांनी बुलेटप्रुफ हेल्मेटची निर्मिती केली आहे.

दावा केला जात आहे की जगातील हे पहिलेच बुलेटप्रुफ हेल्मेट आहे जे 10 मीटर दूर अंतरावरुन एके 47 ने चालवलेल्या गोळीला देखील रोखेल. यापूर्वी अनुप यांनी बुलेट प्रुफ जॅकेटची निर्मिती केली होती जी स्नाइपर रायफलच्या गोळ्यांपासून सुरक्षा देत होती.

सेना अधिकाऱ्यांनी सांगितले की बॅलिस्टिक हेल्मेटला मेजर अनूप मिश्रा यांनी अभेद प्रोजेक्ट अंतर्गत तयार केले गेले. याअंतर्गत पुर्ण बॉडी प्रोटेक्शन बुलेटप्रुफ जॅकेट देखील विकासित केले आहे. अनुप मिश्रा भारतीय सेनेचे कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनियरिंगसाठी काम करतात. मेजर अनुप मिश्रा जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते. या दरम्यान एका ऑपरेशनमध्ये गोळीचे शिकार झाले होते. या दरम्यान त्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट घातले होते, यामुळे गोळी त्यांचे शरीर भेदून बाहेर गेली नाही. परंतु त्या गोळीचे निशाण त्यांच्या शरीरावर अद्यापही आहेत.

यानंतर त्यांनी नवे बुलेटप्रुफ जॅकेट बनवण्याचा निर्णय केला. त्यांनी तयार केलेले बुलेटप्रुफ जॅकेट 10 मीटर अंतरावरुन झाडलेल्या स्नाइपर बुलेटचा सामना करु शकतात. याशिवाय पुण्यात मिलिट्री इंजिनिअरिंग कॉलेजने एक प्रायवेट फर्मसह मिळून जगातील सर्वात स्वस्तातील गनशॉट लोकेटर विकसित केले. हे 400 मीटरच्या अंतरात असलेल्या बुलेटची अचूक माहिती देऊ शकते. यामुळे दहशतवाद्यांची माहिती मिळण्यास मदत होईल.

हे बुलेट प्रुफ जॅकेट तयार केल्याने तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी मेजर मिश्रा यांना आर्मी डिझाइन ब्यूरो एक्सिलेंस अ‍ॅवार्ड देऊन सन्मानित केले होते.

2016 – 17 मध्ये संरक्षण बजेटमध्ये भारतीय सैन्याने 50,000 बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी केले होते. जुलै 2018 साली तत्कालीन संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांनी एक लेखी उत्तरांत सांगितले की एकूण 1,86,138 बुलेट प्रुफ जॅकेट कॉन्ट्रेक्ट दिले होते. यासह डिसेंबर 2016 मध्ये 1,58,279 बॅलिस्टिक हेल्मेट खरेदीसाठी टेंडर काढले होते.

पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनियरिंग सीएमई, एक प्रमुख सामरिक आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थान कोर ऑफ इंजिनिअर्सची मातृ संस्था आहे. सीएमई कॉम्बॅट इंजिनिअरिंग सीबीआरएन प्रोटेक्शन, वर्क्स सर्विसेज आणि जीआयएस प्रकरणी सर्व शस्त्र आणि सेवेतील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यासह इंजिनिअर कोर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जबाबदार आहेत.