युध्द झाल्यास पाक-चीनला मिळणार ‘ठासुन’ उत्‍तर ; भारतीय सेनेकडून सीमेवर ‘इंटीग्रेटेड वॉर ग्रुप्स’ तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे शेजारील देशांशी म्हणजे चीन आणि पाकिस्तानशी तणाव वाढत आहेत. त्यामुळे युद्धाची शक्यता ही आहे. त्यामुळे भारतीय सेनेने सतर्कतेसाठी पाकिस्तानला लागुन असलेल्या सिमेवर इंटिग्रेटेज बॅटेल ग्रुप (आयबीजी) धोरण तयार करित आहे. हे ऑक्टोबर पर्यंत पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर ते चीनच्या सिमेवर तैनात करण्यात येईल.

आयबीजी धोरण आखल्याने युद्ध काळात सैन्याची ताकद आणि क्षमता अधिक वाढणार आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी तोफखाना विभाग गन, टाक्या, हवाई संरक्षण आणि वाहतुकीचा समावेश असणार आहे. या सर्वांचे एकत्रितपणे ते एक पूर्णपणे युद्ध युनिट बनवले जाणार आहे. तीन सशस्त्र दलांमधील समन्वय साधण्याच्या प्रयत्नांमध्ये हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पूर्वेकडील कमांडच्या अंतर्गत या विशिष्ट लढाई धोरणाचा सराव केला आहे. लढाऊ संघाने आणि सर्वोच्च कमांडर अधिकाऱ्यांनी या सरावबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तसंच ऑक्टोबरपर्यंत पाक सीमेजवळ अशा दोन ते तीन आयबीजी तैनात करण्याची तयारी करण्यात येत आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच बैठक घेण्यात आली. तेव्हा या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सात सैन्य कमांडर अधिकाऱ्यांचा सहभाग होता. त्यांना संबंधित क्षेत्राबद्दल आयबीजी बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या तीन आयबीजी पूर्वी कमांडच्या वेगवेगळ्या स्वरुपात तयार केल्या जातील. सैन्याच्या सहभागामुळे सैन्य शक्ती वाढेल. आयबीजी सेना मुख्य अधिकारी जनरल बिपीन रावत हे असणार आहेत. आयबीजी हे अधिक प्रभावी आणि प्राणघातक शक्ती करणार आहे. मेजर जनरल रँक नेतृत्व करणार आहे. आयबीजीचे अध्यक्ष मेजर जनरल रॅंक असतील आणि एक आयबीजीमध्ये ५००० कर्मचारी असणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी