सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी तलावात मारली उडी मारणाऱ्या लेफ्टनंट कर्नलचा मृत्यू !

कांगो : वृत्तसंस्था – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये तैनात असलेले भारतीय लष्कराचे अधिकारी गौरव सोलंकी यांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी हे मध्य अफ्रिकी देशातील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून तैनात होते. UN पीसकीपिंग मिशन अंतर्गत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये कार्यरत असलेले गौरव सोलंकी गेल्या शनिवारपासून बेपत्ता होते.

लेफ्टनंट कर्नल सोलंकी यांच्यासमवेत एक ग्रुप देखील होता. हा ग्रुप मागील रविवारी कांगो आणि रवांडाच्या सीमेदरम्यान चेगेरा बेटाजवळ किवू लेक कायाकिंग ट्रिपवर गेला होता. सैन्याच्या म्हणण्यानुसार, लेफ्टनंट कर्नल गौरव सोलंकी कायाकिंगमधील किवू तलावावर गेले होते आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले.

मित्रांना वाचविताना गेला जीव
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गौरवचे सहकारी अधिकारी तलावामध्ये बुडत होते,  वाचवण्यासाठी गौरवनेही आपले जीवन जॅकेट काढून तलावामध्ये उडी मारली. यात सहकारी किनाऱ्यावर पोहचले असले तरी गौरव तलावातच बुडाले.

काही दिवसांतच देशात परत येणार होते
एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार कयाकिंग सहलीनंतर सोलंकी वगळता सर्वजण परत आले. त्यामुळे हरवलेल्या सोलंकी यांचा शोध घेण्यासाठी स्पीड बोट आणि हेलिकॉप्टरने शोध आणि बचावकार्य सुरू केले. गुरुवारी चेगेरा बेटापासून काही अंतरावर सोलंकीचा मृतदेह सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकीने कांगोमध्ये आपले काम पूर्ण केले होते आणि येत्या काही दिवसांत ते भारतातल्या त्यांच्या रेजिमेंटमध्ये सामील होणार होते.

कांगोमध्ये २ हजारांपेक्षा अधिक भारतीय सैनिक तैनात
डीआरसीमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाला मोनोस्को म्हणून ओळखले जाते. परदेशी भूमीवर भारतीय सैन्याची सर्वात मोठी तैनाती कांगोमध्ये आहे. येथील भारतीय ब्रिगेडचे मुख्यालय उत्तर किवु प्रांताची राजधानी गोमा येथे आहे. शांतता मिशन अंतर्गत आतापर्यंत २,६१३ भारतीय सैनिक मोनोस्कोमध्ये तैनात आहेत.

Loading...
You might also like