‘1971 पेक्षा वाईट मारू’, पाकच्या धमकीला दिलं भारतीय सैन्यानं उत्‍तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ढिल्लन यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याला सर्वतोपरी प्रयत्न करु द्या, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, जे त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा लक्षात राहील. आम्ही 1971 पेक्षाही वाईट हालत पाकिस्तानची करू.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या अनेक मंत्र्यांनी आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. तथापि, अलीकडेच आपल्या एका लेखात इम्रानने संभाषणाबाबत इशारा दिला. वास्तविक, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान चांगलाच चिडला आहे. त्याने हे प्रकरण अनेक देशांसमोर मांडले मात्र कोणीही पाकिस्तानला मदत केली नाही.

सैनिकांनी पकडले दोन आतंकवादी –

जम्मू-काश्मीर पोलिसांचे लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन आणि एडीजी मुनीर खान यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की भारतीय लष्कराने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही दहशतवाद्यांना 22 ऑगस्ट रोजी रात्री बारामुला येथून अटक करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत पकडलेल्या दहशतवाद्याचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला. खलील अहमद आणि मोजाम खोकर अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये अशांतता पसरवायची आहे. पाक सैन्य दहशतवाद्यांना मदत करत आहे. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, बरेच दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की, चौकशी दरम्यान लष्करच्या अतिरेक्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा आणि हल्ले करण्याचा विचार करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –