Sarkari Naukri : Indian Army मध्ये निघाली भरती, परीक्षेशिवाय मिळवू शकता नोकरी, वेतन 97,000

नवी दिल्ली : इंडियन आर्मीमध्ये भरती निघण्याची वाट पाहणार्‍या तरूणांसाठी चांगली बातमी आहे. एसएससीने इंडियन आर्मीच्या 300 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती महिला आणि पुरूष, दोन्ही वर्गासाठी आहे. निवडलेल्या उमेदवारांना 97000 प्रति महिना वेतन मिळेल. जाणून घेवूयात या भरतीशी संबंधित अन्य सर्व माहिती…

आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने मेडिकल डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एसएससीद्वारे काढण्यात आलेल्या भरतीसाठी 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची मोजणी 31 डिसेंबर 2020 नुसार केली जाईल.

Indian Army Recruitment 2020 : पदांची माहिती

पुरुष उमेदवार : 270

महिला उमेदवार : 30

एकुण पदे : 300

Indian Army Recruitment 2020 : महत्वाच्या तारखा…

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2020

इंटरव्ह्यूची संभाव्य तारीख : 31 ऑगस्ट 2020

पात्रता
उमेदवारांकडे एमबीबीएसची डिग्री असणे गरजेचे आहे. याशिवाय स्टेट मेडिकल कौन्सिल/एमसीआय/एनबीईमधून पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री किंवा डिप्लोमा केलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.

उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारावर होईल. यासाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतील.