Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Indian Army Recruitment 2021 | लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण- तरुणी नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत.
अशा परिस्थितीत भारतीय सैन्य दलात (Indian Army Recruitment 2021) राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र (NCC) असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
भारतीय सैन्यदलाने शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत एनसीसी ( NCC) स्पेशल एंट्री स्कीममध्ये भरती प्रक्रिया सुरु केली आहे. महिला आणि पुरुष उमदेवारांना अर्ज करता येईल.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांना joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी 16 जूनपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पदाचे नाव : एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम (NCC Special Entry Recruitment 2021) 50 वा कोर्स ऑक्टोबर 2021

पदांची संख्या : पुरुष उमेदवार : 50 महिला उमेदवार 05

पात्रता

इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांकडे एनसीसी सी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
उमेदवार हा भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
या पदासाठी उमेदवारांचे वय 19 वर्ष ते 25 वर्षांदरम्यान असावे. जुलै 2021 ला उमेदवार 19 वर्षांपेक्षा अधिक किंवा 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत.

निवड प्रक्रिया
इंडियन आर्मीमध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममध्ये उमेदवारांची कोणतीही परीक्षा होणार नाही. अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावल जाईल.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Services Selection Board in india) द्वारे मुलाखतीची प्रक्रिया होईल.
ही प्रक्रिया 5 दिवस चालते. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेडिकल उत्तीर्ण व्हावे लागेल.
त्यानंतर केंद्रीय वेतनश्रेणी स्तर 10 नुसार निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  indian army recruitment 2021 ncc entry in short service selection

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत