Indian Army Recruitment 2021, Sarkari Naukri : इंडियन आर्मीमध्ये नोकरीची संधी; 1.77 लाखापर्यंत पगार, येथे करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय लष्करात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरूणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्कराने JAG Entry Scheme 27th Course OCT 2021 साठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज करण्यासाठी पात्र आहेत, मात्र ते अविवाहित असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा…

* ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 06 मे 2021
* ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 04 जून 2021

पदांची माहिती

* जेएजी एंट्री स्कीम 27वा कोर्स ऑक्टोबर 2021 (पुरुष)- 06 पदे
* जेएजी एंट्री स्कीम 27वा कोर्स ऑक्टोबर 2021 (महिला)- 02 पदे
* एकुण पदे – 08

वेतन

भरती प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला मॅट्रिक्स लेव्हल 10 च्या आधारावर 56100 रुपये प्रति महिना ते 1,77,500 रुपये प्रति महिन्यापर्यंत वेतन मिळेल.

पात्रता

जेएजी 2021 कोर्ससाठी अर्ज करणारे उमेदवार 55 टक्के गुणांसह लॉमध्ये ग्रॅज्युएटची डिग्री असणे आवश्यक आहे. (ग्रॅज्युएशननंतर 3 वर्षांचा डिग्री कोर्स किंवा 10 + 2 च्यानंतर पाच वर्षाचा डिग्री कोर्स केलेला असावा)

वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय 21 वर्षापासून 27 वर्षादरम्यान असावे. वयाचा हिशेब 01 जुलै 2021 पर्यंत केला जाईल. कोणतेही अर्जशुल्क नाही.

निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी इंटरव्ह्यू आणि मेडिकल एग्झामच्या आधारावर निवडले जाईल. निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईवर जावून पहावी.

अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
http://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/JAG_MEN_27.pdf

अर्जासाठी येथे क्लिक करा.
http://joinindianarmy.nic.in/login.htm

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx