Indian Army मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 1,77,500 रूपयांपर्यंत पगार, आजच करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय सैन्यात 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. भारतीय सैन्यात 10 + 2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स (टीईएस -44) अंतर्गत 90 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज म्हणजेच 9 सप्टेंबर 2020 या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

पात्रता
भारतीय सैन्य टीईएस भरतीसाठी, उमेदवारास मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून किमान 70% गुणांसह 10 + 2 उत्तीर्ण केले पाहिजे.

वय श्रेणी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान 16 वर्षे 6 महिने असणे आवश्यक आहे. त्याच वेळी जास्तीत जास्त 19 वर्षे 6 महिने पर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. वयोमर्यादा 01 जानेवारी 2021 पासून मोजली जाईल.

निवड प्रक्रिया
भारतीय लष्कराच्या टीईएस 44 कोर्ससाठी उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा स्तर 10 अंतर्गत 56,100 ते 1,77,500 / – रुपये पगार म्हणून दिले जातील.

अर्ज कसा करावा
इंडियन आर्मी टीईएस 44 कोर्ससाठी इच्छुक उमेदवार 2021 जानेवारी संबंधित वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन 9 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांचा अर्ज सर्व उमेदवारांसाठी विनामूल्य आहे .