Indian Army Recruitment : लष्करात महिलांसाठी खुली भरती, जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार रॅली

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय लष्करात महिला सैन्य पोलिसांच्या दुसर्‍या बॅचच्या भरती रॅलीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 18 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) साठी खुल्या भरतीचे आयोजन केले जात आहे.

भारतीय लष्करात सैनिक श्रेणीची ही भरती रॅली प्रक्रिया केवळ महिला कँडिडेट्ससाठी आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांच्या उमेदवारांसाठी भारतीय लष्करात महिला सैन्य पोलीस (सैनिक जनरल ड्यूटी) च्या नामांकनासाठी एएमसी सेंटर अँड कॉलेज, लखनऊ (उत्तर प्रदेश) च्या स्टेडियममध्ये 18 जानेवारी 2021 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत मुख्यालय भरती कार्यालय लखनऊद्वारे भरती रॅलीचे आयोजन करण्यात येईल.

5898 महिला उमेदवार सहभागी होण्याची शक्यता

इंडियन आर्मीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांतील 5898 महिला या भारती प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीसाठी 5898 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्यामध्ये 5573 उमेदवार युपी आणि 325 उत्तराखंडतील आहेत. या भारतीसाठी पात्रता/मापदंड योग्यता आणि चाचणीशी संबंधीत सविस्तर माहिती 27 जुलै 2020 च्या अधिसूचनेत देण्यात आली होती, जी www.joinindianarmy.nic.in चा वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सैन्य भरती कार्यालयाने उमेदवारांना दलाल आणि फसवणूक करणार्‍या व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जर उमेदवारांची वागणूक चुकीची आढळली तर रॅलीमध्ये सहभागी होता येणार नाही आणि त्यांचा अर्ज रद्द केला जाईल.