भारताचे औदार्य, सीमेत घुसलेल्या चीन सैनिकाला परत केले, चीनच्या सरकारी मीडियाने दिली माहिती

नवी दिल्ली : चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सनुसार भारतीय लष्कराने चीनी सैनिकाला परत केले आहे. चीनी सैनिक डेमचोक सेक्टरमध्ये भरकटून भारतीय सीमेत घुसला होता. ज्यास तपासानंतर आता पुन्हा चीनी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्विट केले की, विवारला चीन-भारत सीमेजवळ याक शोधण्यासाठी मदत करताना बेपत्ता झालेल्या पीएलए सैनिकाला बुधवारी भारतीय लष्कराने चीनी सीमा सैनिकांना परत केले.

भारतीय लष्कराने म्हटले होते – सैनिकाला परत गेले जाईल
लडाखच्या चुमार-डेमचोक परिसरात एका चीनी सैनिकाला भारतीय जवानांनी सोमवारी पकडले होते. सूत्रांनुसार, लष्कराने शक्यता वर्तवली होती की, हा सैनिक चुकून बॉर्डर क्रॉस करून आला असावा. पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये पीएलएचा एक सैनिक कॉर्पोरल वांग यां लाँगला पकडले. तो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भरकटला होता. पकडलेल्या पीएलए सैनिकाला ऑक्सीजन, जेवण आणि गरम कपड्यांसह वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती.

लष्कराने सांगितले की, प्रोटोकॉलनुसार पकडलेल्या सैनिकाला लडाखमध्ये चुशूल-मोल्डो बैठक स्थळावर चीनी अधिकार्‍यांकउे सोपवण्यात आले.

भारत चीन सीमेवर तणाव कायम
मागील सुमारे सहा महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाइी अनेक राजकीय आणि सैन्य स्तरावरील बैठका सुरू आहेत. परंतु, कोणताही मार्ग निघत नसल्याचे दिसत आहे. हा तणाव पाहाता भारत आणि चीनने मोठ्या संख्येत सीमेवर जवान तैनात केले आहेत.