Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector (Ladakh) | लडाखमध्ये 26 सैनिक असलेले वाहन दरीत कोसळले: 7 जवानांचा मृत्यू, अनेकजण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector (Ladakh) | भारतीय लष्कराचे वाहन लडाख येथील दरीत कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 7 जवानांचा दुर्दैवी मृत्यू (7 Indian Army soldiers lost their lives) झाला आहे. या वाहनांमध्ये 26 सैनिक होते. या अपघातात अनेक जवान जखमी (Injured) झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अनेक जवानांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.

 

थॉईसपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून यामध्ये 7 जवांनाच्या मृत्यूचा आकडा हाती लागला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सर्व 26 जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये (403 Field Hospital) हलवण्यात आले आहे. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम रवाना झाली आहे.

 

 

दरम्यान, ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे.
दरम्यान, लष्कराचं वाहन कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीमध्ये (River) पडली, हे अजुन स्पष्ट झालेले नाही.
या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत माहिती आली नाही. दरम्यान, सैनिकांची बस संक्रमण शिबिरातून सब सेक्टर हनीफच्या पुढे जात होती.
त्यावेळी हा आघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

Web Title :- Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector (Ladakh) | Indian army vehicle falls into valley in ladakh 7 young martyrs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा