भारतीय लष्करानं उडवली शत्रूंची झोप, पुन्हा केली सर्जिकल स्ट्राइक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने म्यानमारच्या सैन्याबरोबर मिळून म्यानमारच्या सीमारेषेवर असलेले दहशतवाद्यांची अनेक ठिकाणे नेस्तनाबूत केली आहेत.

गेल्या वर्षीही म्यानमारच्या हद्दीत शिरुन तेथील काही दहशतवादी तळ भारतीय लष्कराने उध्वस्त केले होते. बांगला देशाच्या लष्कराबरोबर भारतीय लष्कराने १७ फेब्रुवारी रोजी सुरु केलेले हे ऑपरेशन दोन आठवडे सुरु होते. दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचे हे ऑपरेशन २ मार्चपर्यंत सुरु होते. मात्र, याची वाच्यता लष्कराने केली नाही. म्यानमारमधील बंडखोर असलेल्या रोहिंग्या दहशतवादी समूहाने मिझोरामच्या सीमेजवळ नवे तळ बनवले होते.

जे कलादान प्रोजेक्टवर निशाणा साधून होते. हा प्रोजेक्ट भविष्यात उत्तर-पूर्वचे नवे प्रवेशाद्वार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत आणि म्यानमारच्या सैन्यानं संयुक्त मोहीम राबवत मिझोराममधल्या सीमावर्ती भागात नव्यानं तयार करण्यात आलेल्या दहशतवादी शिबिरांना उध्वस्त केले. या मोहिमेच्या दुसऱ्या भागात टागातील एनएससीएन (के) च्या मुख्यालयावर निशाणा साधण्यात आला आणि अनेक शिबिरे नेस्तनाबूत करण्यात आली. अराकान सैन्याला काचिन इंडिपेंडेंस आर्मीद्वारे ट्रेनिंग देण्यात आले असून, ते दहशतवादी उत्तर सीमेच्या चीनपर्यंत पसरलेले आहेत.

या दहशतवाद्यांनी अरुणाचलला लागून असलेल्या भागापासून ते मिझोराम सीमेपर्यंतच्या १ हजार किमी परिसरात वास्तव्य केले होते.  त्यातील बहुतांश कॅम्प नेस्तनाबूत करण्यात लष्कराला यश आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us