बालाकोट एअर स्ट्राईकवेळी भारतीय लष्कर होते या विशेष मोहिमेवर

पोलीसनामा ऑनलाईन – बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आली. त्यावेळी भारतीय सेना आणखी एका मोठ्या मोहिमेवर होती. भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करासोबत गुप्तपणे भारत म्यानमार सीमेवर आराकान आर्मीला संपविण्यासाठी मोठी कारवाई केली. इशान्य भारतातील प्रकल्पांना आराकान आर्मीचा धोका असल्याने हे ऑपरेशन करण्यात आले असे वृत्त इंडीया टुडेने दिले आहे.

भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली तेव्हा जगाचे आणि माध्यमांचे लक्ष त्याकडे होते. त्याचवेळी भारतीय लष्कर आणि म्यानमार लष्कराने ही मोहिम फत्ते केली. दोन महिन्यांआधीच मोहिमेची रणनीती आखण्यात आली होती. इशान्य भारतात असलेल्या प्रकल्पांना आराकान आर्मीकडून धोका होता. आराकान आर्मी ही काचीन इंडीपेन्डन्स आर्मीशी संबंधित आहे. या संघटनेवर म्यानमारमध्ये या आराकान आर्मीचा कालादान प्रकल्पाला धोका होता.

भारत आणि म्यानमारच्या लष्कराने संयुक्त मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात मिझोरमच्या सीमेवर असलेल्या कॅम्पसना लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यत एनएससीएन (के) चे तळ उध्वस्त केले. दोन आठवडे हे ऑपरेशन चालले. भारतीय लष्कराच्या आसाम रायफल, स्पेशल फोर्सेस, अन्य युनीट यात सहभागी झाले होते.