Indian Bank | 115 व्या स्थापना दिनानिमित्त इंडियन बँकेकडून रक्तदान शिबीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – इंडियन बँकेच्या (Indian Bank) 115 व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी (दि.10) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये इंडियन बँकेचे (Indian Bank) कर्मचारी आणि खातेदारांनी रक्तदान केले. शिबीराचे आयोजन इंडियन बँकेच्या नाना पेठ शाखेत करण्यात आले होते.

रक्तदान शिबीर झोनल मॅनेजर केजीएफ फैजानी आणि डेप्युटी झोनल मॅनेजर प्रकाश निमजे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. बँकेचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीरात सक्रियपणे सहभाग घेतला. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पुणे ब्लडबँक हडपसर यांच्यावतीने इंडियन बँकेचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला सहायक महाव्यस्थापक, शाखा व्यवस्थापक रणजित सिंह भुर्जी, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक सौरभ कुमार, मुख्य व्यवस्थापक अतनू कोंच, विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक क्रेडिट सुमित कुमार, मुख्य व्यवस्थापक कुमार प्रशांत, वरिष्ठ व्यवस्थापक मार्केटींग बिभूती भूषण सेठी, वरिष्ठ व्यवस्थापक महादेव ढाकणे यांच्यासह मुख्य व्यवस्थापक इन्स्पेक्शन सेंटर किशोर ठाकूर आणि इंडियन बँक नाना पेठ शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title :- Indian Bank | Blood Donation Camp by Indian Bank on the occasion of 115th Establishment Day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांत पडणार पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 7,720 ‘कोरोना’मुक्त, 5,609 नवीन रुग्ण

Punjab Corona | पंजाबमध्ये कोरोनाचा उद्रेक; शाळा सुरू होताच 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा