‘या’ सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन बँकेमध्ये सुरक्षारक्षकासह शिपाई पदासाठी मोठी भरती होणार असून 115 जागांसाठी हि भरती होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख असून अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटवरील जाहिरात तुम्ही पाहू शकता. इच्छुक उमेदवारांची निवड हि पात्रतेनुसार केली जाणार असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पदे
सुरक्षा रक्षक आणि शिपाई

पदांची संख्या :115

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीतकमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 26 वर्ष असावे.

महत्वाच्या तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 04 ऑक्टोबर 2019
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2019

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीतकमी १० वी पास असावा.

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवार बँकेच्या www.indianbank.in या वेबसाईटवर जाऊन 4 ऑक्टोबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड हि ऑब्जेक्टिव टाइप ऑनलाइन टेस्ट, स्थानिक भाषा टेस्ट तसेच शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
चयन प्रक्रिया :

या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चौकशी करा :https://www.indianbank.net.in/jsp/startIBPreview.jsp

नोटिफिकेशन साठी येथे क्लिक करा :https://indianbank.in/wp-content/uploads/2019/10/Detailed-advertisement-for-recruitment-of-Security-Guard-cum-Peon.pdf

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :https://ibpsonline.ibps.in/indbnksoct19/