Indian Bison Pune | पुण्यात ‘थरार’ केलेल्या ‘त्या’ रानगव्याची Facebook लाईव्हद्वारे प्रायश्चित सभा होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Bison Pune | पुण्यात 9 डिसेंबर 2020 रोजी रानगवा (Indian Bison Pune) आला होता. कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात (Mahatma Society, Kothrud) हा रानगवा निदर्शनास आला. त्या ठिकाणी जवळपास 7 तास या गव्याचा थरार चालु होता. इकडे-तिकडे भिरकटत होता पण त्याला वाट सापडली नाही. तेव्हा पुणेकरांनी गव्याचे फोटोही मोबाईलमध्ये कैद केले. गव्याचा थरार, त्यात नागरिकांचा गोंधळ यामुळे गवाही घाबरला होता. अखेर वनविभागाने (Forest Department) त्याला गुंगीचे औषध देऊन जाळीत पकडले.

 

पुण्यात शिरलेल्या रानगव्याला (Indian Bison Pune) सैरावैरा पळाल्याने त्याला अंगावर जखमा झाल्या होत्या. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु (Died) झाला. 2020 मध्ये घडलेल्या घटना आणि त्या गव्याचे प्रायाश्चित करण्यासाठी कोथरुडमधील निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनकडून प्रायश्चित सभा आयोजित केलीय. या सभेचे फ्लेक्स कोथरुडमध्ये लावण्यात आलेय. कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनी येथे ही सभा 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या सभेचे फेसबुक लाईव्हही (Facebook Live) केले जाणार आहे.

 

”हा गवा देखील माझ्या कुटुंबातील एक घटक होता. त्याला आम्ही जनता, प्रशासनाने पळवून पळवून मारला. दरवर्षी पुण्यस्मरण दिन आयोजित करुन जनजागृती करणार आहोत. तसेच प्रशासनाने देखील असा एखादा प्राणी मानवी वस्तीत आला तर लोकांनी कशा प्रकारे वागले पाहिजे याबाबत नियम करायला हवेत,” असं निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन धनकुडे (Sachin Dhankude) म्हटले आहे.

दरम्यान, वनखात्याच्या माहितीनूसार, (Forest Department) या रानगव्याचे 700 ते 800 किलो वजन होते.
उंची 5 ते साडेपाच फुट होती. वय अंदाजे 3 ते 4 वर्षांचे होते, गुंगीच्या औषधांचा अतिमारा, घाबरुन हृदय बंद पडणे,
धावपाळ-भूक यामुळे झालेले श्रम यातल्या कोणत्या कारणामुळे गव्याचा मृत्यू झाला याबद्दल पुणेकर आणि प्राणिमित्रांमध्ये चर्चाही झाली होती.
महात्मा सोसायटीतील नागरिकांना घरात थांबायला सांगून बचाव पथकाने जाळी लावून, गुंगीचे औषध देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु, हुलकावणी देत गवा पसार झाला. त्यानंतरही अथक प्रयत्न करुन गव्याच्या गळ्याला गुंगीचे औषध देऊन पकडले.

 

Web Title :- Indian Bison Pune | Indian Bison came pune last year had died Sachin Dhankude facebook live

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | 1971 च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय ! शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता – मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

Omicron Variant in Maharashtra | ‘…तरच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Aba Bagul | मिळकत कराच्या अभय योजनेला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस नेते आबा बागूल यांचा सत्ताधारी आणि प्रशासनावर हल्लाबोल