10 वी पाससाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये नौकारीची संधी, 47 हजारपेक्षा जास्त पगार

नवी दिल्ली : इंडियन कोस्ट गार्डमध्ये इच्छूकांना नोकरीची चांगली संधी आहे. कोस्ट गार्डमध्ये नाविक पदावर भरतीसाठी योग्य उमेदवारांची आवश्यकता आहे. कोस्ट गार्डच्या गृह शाखेने नाविकच्या विविध पदांवर व्हॅकन्सी काढली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर (joinindiancoastguard.gov.in) वर व्हिजिट करून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे.

अधिकृत वेबसाइटवर यासाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जारी नोटिफिकेशनमध्ये पूर्ण माहिती प्राप्त करून अर्ज करू शकतात.

नोटिफिकेशननुसार, कँडिडेट्सची भरती कुक आणि स्टीवर्ड पदांवर केली जाणार आहे आणि एकुण 50 रिकामी पदे या भरती अभियानाच्या माध्यमातून भरली जातील. उमेदवारांची निवड होण्यासाठी लिखित परीक्षेसह फिजिकल टेस्टसुद्धा द्यावी लागेल. ज्याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 12वी पास असणे अनिवार्य आहे. या पदांसाठी 10वी पाससुद्धा अर्ज करू शकतात.

संस्थेचे नाव – भारतीय तटरक्षक दल
पदाचे नाव – नाविक
पदांची संख्या – एकुण संख्या 50
अर्ज शुल्क – निःशुल्क
वेतन – 21700 (लेव्हल-3) आणि 47,600 (लेव्हल-8)

महत्वपूर्ण तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 7 डिसेंबर 2020
कसा कराल अर्ज – अधिकृत वेबसाइट https://www.joinindiancoastguard.gov.in/ वर अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था/विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांवस गणित आणि रसायनशास्त्र विषयासह 10वीची परीक्षा पास असावा. एससी, एसटी आणि स्पोर्टस कोटाअंतर्गत येणार्‍या तरूणांना 5 टक्के गुणांची सूट मिळेल.

वयोमर्यादा –
या पदांसाठी कँडिडेटचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 22 वर्ष असावे. तर आरक्षित वर्ग आणि स्पोर्टस कोटा अंतर्गत येणार्‍या कँडिडेटसाठी किमान गुणात 5 टक्केची सूट सुद्धा आहे.